कारवाईसाठी व्हॉट्सअॅप चॅट हा सक्षम पुरावा असू शकत नाही, उज्ज्वल निकम यांची माहिती 

पूजा विचारे
Friday, 25 September 2020

काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅटवरुन ड्रग्स संदर्भात काही नावे समोर आली. मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावर आपलं मतं व्यक्त केलं आहे.

मुंबईः  एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. त्यात आता काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅटवरुन ड्रग्स संदर्भात काही नावे समोर आली. मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावर आपलं मतं व्यक्त केलं आहे. केवळ व्हॉट्सअॅप चॅट हा त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम पुरावा असू शकत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी एनसीबीला आणखी सखोल तपास करावा लागणार असल्याचं निकम यांनी सांगितलं. संबंधित अभिनेते किंवा अभिनेत्री या कुणाकडून ड्रग्ज घेत होत्या, याच्या मुळापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला जावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचाः र्भवतींच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष नको; 88 टक्के पॉझिटिव्हमध्ये नाहीत लक्षणे

शौविकची तुरुंगात जाऊन चौकशी 

या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा कूक दीपेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिघांनाही नवी मुंबईतल्या तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.  दरम्यान कोर्टानं गुरुवारी शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांची तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी एनसीबीला दिली आहे.  शौविकच्या मोबाइल फोनमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

शौविकचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं एनसीबीनं कोर्टात दावा केला असल्याचं नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सब्स्टांसेस अॅक्ट, 1985 (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) च्या स्पेशल कोर्टासमोर एनसीबीने सांगितलं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी शौविक चक्रवर्ती सध्या तुरुंगात आहे. रियाच्या आधी शौविक आणि दिपेशला अटक करण्यात आली होती. 

अधिक वाचाः  टोलदरात वाढ, मुंबईच्या पाच एन्ट्री पॉईंटवर 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोल भार

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या संपर्कात शौविक होता, अशी माहिती चौकशीदरम्यान उघड झाली. यामुळे शौविकची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दिपेश सावंतची देखील चौकशी करणं गरजेचं असल्याचं एनसीबीनं कोर्टात सांगितलं. एनसीबीनं केलेली ही मागणी मान्य करत कोर्टानं तळोजा तुरुंगात  जाऊन  दोघांची चौकशी करता येईल अशी परवानगी दिली आहे. 

NCB action bollywood WhatsApp chat may not be competent evidence informed Ujjwal Nikam


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB action bollywood WhatsApp chat may not be competent evidence informed Ujjwal Nikam