esakal | वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडेंची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede Kranti Redkar

वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणांचा पर्दाफाश करणारे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede सध्या चर्चेत आहेत. प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह Aryan Khan आठ जणांना अटक केली. वानखेडे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आणलं होतं.

कोण आहेत समीर वानखेडे?

वानखेडे हे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. सीमाशुल्क अधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. २००८ ते २०२० पर्यंत त्यांच्या पोस्टिंग आणि पदांमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटचे उपायुक्त (एआययू), राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त एसपी (एनआयए), महसूल गुप्तचर संचालनालयाचे संयुक्त आयुक्त (डीआरआय) आणि एनसीबीचे विभागीय संचालक यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Drugs: NCB बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतेय का? समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर

वानखेडे यांची कामगिरी

सीमाशुल्क विभागात काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रिटींना परकीय चलनात खरेदी केलेल्या सामानाची माहिती उघड केल्याशिवाय आणि त्यावरील योग्य तो कर भरल्याशिवाय कस्टमची मंजुरी दिली नाही. कर न भरल्याबद्दल त्यांनी दोन हजारहून अधिक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे. २०१३ मध्ये वानखेडे यांनी गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी चलनासह पकडलं होतं. याशिवाय अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. २०११ मध्ये कस्टम ड्युटी भरण्यासाठी त्यांनी मुंबई विमानतळावर सोन्याची क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी अडवली होती. ती भरल्यानंतर त्यांनी विमानतळावरून नेण्यासाठी परवानगी आली.

अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. मार्च २०१७ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

loading image
go to top