CAA आणि NRC बद्दल 'ही' आहे राज ठाकरेंची भूमिका..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

मुंबई -  २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामेळावा मुंबईत पार पडला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी '...तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन' असं वक्तव्य केलं होतं. एकंदरच हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच देशात CAA आणि NRC या दोन विषयांवरून मोठ्या प्रमाणात वादंग आहे. संपूर्ण देशभरात याविरोधात आणि समर्थनार्थ मोठे मोर्चे निघतायत, आंदोलनं होतायत.

मुंबई -  २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामेळावा मुंबईत पार पडला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी '...तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन' असं वक्तव्य केलं होतं. एकंदरच हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच देशात CAA आणि NRC या दोन विषयांवरून मोठ्या प्रमाणात वादंग आहे. संपूर्ण देशभरात याविरोधात आणि समर्थनार्थ मोठे मोर्चे निघतायत, आंदोलनं होतायत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मोठी बातमी - नवाब मालिकांचं सुधीर मुनगंटीवारांना ओपन चॅलेंज, म्हणालेत हिम्मत असेल तर...

CAA ला विरोध NRC ला पाठिंबा 

सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) आपला विरोध आहे आणि NRC ला मात्र आपलं समर्थन आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी आपलं मत मांडलं आहे. यावर सविस्तर बोलताना, ''बेकायदा बांगलादेशींना हाकलून लावलं पाहिजे' हीच भूमिका राज ठाकरे यांनी कायम घेतलीये, पुण्यातदेखील राज ठाकरे यांनी हीच भूमिका घेतली होती, असं बाळा नांदगावकर म्हणालेत. 

मोठी बातमी -  लज्जास्पद ! चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर..

भारतात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि आणखी कुणीही असोत सर्वांना या देशातून हाकलून द्या. दरम्यान ज्या भूमिका देशहितासाठी केंद्राने घेतल्यात, उदाहरणार्थ कलम ३७०, राम मंदिर याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला पाठिंबा दिलाय. NRC ला देखील पाठिंबा आहे. त्यामुळे 'देशातील अवैध नागरिक भारताबाहेर जातील' अशीच राज ठाकरे यांची भूमिका आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हणटलंय. 

stand of Maharashtra Navnirman Sena chief raj thackeray on NRC and CAA


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stand of Maharashtra Navnirman Sena chief raj thackeray on NRC and CAA