लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई?

mumbai-local.jpg
mumbai-local.jpg

मुंबई: राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास प्रवाशांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. यासह सोमवारी रोजी राज्य सरकारकडून नियमावली जाहिर होणार आहे. यामध्ये लोकल प्रवासाबाबतची नियमावली जाहिर केली जाणार आहे. तुर्तास राज्य सरकाराने सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, सोमवारी रोजी सर्वसामान्य प्रवासी मर्यादित वेळेत प्रवास करण्याची मुभा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील लोकल, लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही. तसेच प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य केले आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे पाहण्यची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी प्रवाशांना 72 तासाचा कोरोना चाचणीचा अहवाल बाळगणे आवश्यक आहेत. हा नियम राज्य अंतर्गत रेल्वे गाड्यांसाठी सुद्धा हा नियम लागू करण्यात आला आहे.  यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्यावर कसलाही नियम लागून नव्हता. फक्त देशांतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी केली जायची. मात्र आता कोरोना वाढता प्रादुर्भावामुळे आता राज्य सरकारने सरसकट सर्व रेल्वे गाड्यांवर हे नियम लावलेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी कार्यालयांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इतर क्षेत्रातील प्रवाशांना लोकल प्रवास करायचा की नाही,असा प्रश्न पडलेला आहे.  मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला राज्य सरकारांकडून रात्री उशिरापर्यंत नियमावलीची माहिती प्रसारित केली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहेत.

सध्या लोकल फेऱ्या मध्य रेल्वेवर 1हजार 774 यापैकी 1 हजार 685 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 1हजार 333 पैकी 1हजार 200 लोकल फेऱ्या धावत आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बारा डब्याची लोकल धावत आहे. 12 डब्याच्या लोकलमध्ये प्रवासी क्षमता 1 हजार 200 आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जेवढी आसन क्षमता आहे, तेवढेच प्रवासी बसू शकतात. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करू शकत नाही, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. लोकलमध्ये उभे राहून कारवाई करण्यात येईल किंवा लोकलमध्ये उभ्याने प्रवास करू शकत नाही,   यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.

कोरोनाची पहिली लाट आली असताना राज्य सरकारने लोकल प्रवास करताना सामायिक अंतर राखण्यासाठी 1 हजार 200 आसन क्षमता असलेल्या लोकलमध्ये 700 प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली होती. त्यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला यासंबंधीत निर्देश दिले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने प्रत्येक आसनावर सामायिक अंतर राखण्यासाठी 'येथे बसू नका' असे पोस्टर लावले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर प्रवाशांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत होते. तरी सुद्धा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस बघ्याची भूमिका घेत होते.

कार्यालयीन वेळेत बदल करावा-
लोकल प्रवासात जशी-जशी गर्दी वाढू लागली. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने, रेल्वे पोलिसांनी नवनवीन उपाययोजना आणणे आवश्यक होते. प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्यासाठी लोकलमध्ये महापालिकेचे क्लीनअप मार्शलचे पथक फिरत होते. तसेच लोकलमधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक, भरारी पथक तैनात केले पाहिजे होते. 1 फेब्रुवारीपासून गर्दीच्यावेळी प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे बंदच करण्यात आले. यासह कार्यालयीव वेळा बदलणे, 15 डब्याची लोकल सेवा चालविणे याबाबी प्रशासनाने तत्काळ करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

प्रत्येक प्रवासी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिग करा
मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  खरच ही बाब अत्यंत चिंतेची आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नयेत, यासाठी शासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनात शासकीय आणि खासगी कार्यालयाच्या वेळेत बदल करावेत आणि कर्मचाऱ्यांची क्षमता 50 टक्के करण्याची मागणी केली आहे. तसेच खासगी कार्यालय आणि शासकीय कार्यालयातील साप्ताहिक सुट्टीत बदल करावा. तसेच लोकल प्रवाशांना प्रवासासाठी दिलेल्या वेळेत प्रवास करावा यांची सक्ती अंमलबजावणी राज्य सरकार आणि रेल्वेने करावेत. विशेष म्हणजे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे स्थानकावर व्यवस्था करावी, अशी मागणी रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे.

लोकल प्रवासी संख्या कमी होण्याची शक्यता
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहणार आहे. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील. शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत, तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील.

कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घेण्यात येणार आहेत. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. त्यामुळे येत्या काही दिवसात लोकल प्रवासी संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com