वसई ते सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा; नागरिकांसह प्रवासी संघटना आग्रही

प्रशांत कांबळे
Sunday, 8 November 2020

वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू रोड पर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील लोकवस्ती आठ लाखाच्या घरात आहे.

मुंबई : वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू रोड पर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील लोकवस्ती आठ लाखाच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढणार असून, कोकण मार्गावरून मुंबईसाठी प्रवास करायचा असल्यास त्रास सहन करावा लागतो आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या जलद गतीच्या रेल्वे गाड्यांचा थांबा नाही. त्यामुळे पॅसेंनजर गाड्या सुरू करण्याची मागणी कोकनवासीयांनी केली आहे. 

हेही वाचा - कालका-शिमल्यात धावणार परळ कार्यशाळेतील इंजिन, 12 इंजिन उभारणीचे ऑर्डर

गेल्या तीन वर्षांपासून ये पॅसेंनजर गाड्यांची मागणी कोकणातील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याकडे रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष आहे. यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार झाल्यास भविष्यात पश्चिमरेल्वे, मध्यरेल्वे व हर्बर लाईनवरील सर्व कोकणवासीयांना याचा फायदा होणार असून, या गाड्या वांद्रे टर्मिनल, मुंबई सेंट्रल टर्मिनल किंवा वलसाड टर्मिनल येथून सोडावी शिवाय त्या फक्त धिम्या मार्गावर चालवण्यात यावी 

त्यासोबतच भोईसर, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा आणि चिपळूण या परिसरात दाट लोकवस्ती आहे. मोठ्या प्रमाणात एमआयडिसीतील उद्योग आहे.  त्यामुळे या मार्गावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांच्या तुलनेत मेमू रेल्वे कमी पडत आहे. त्यामुळे डहाणू पनवेल मेमूच्या फेऱ्या वाढवून, या मेमु पुढे चिपळूणपर्यंत नेण्यात यावी. त्यामुळे कोकण मार्गावरील इतर गाड्यांमधील गर्दी कमी करण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय मेमुची तिकीट दर सुद्धा सर्व सामान्य प्रवाशांना परवडणार आहे. अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल, रायगड खासदार सुनील तटकरे, रत्नागिरी खासदार विनायक राऊत यांच्याकडे
केल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेनेचे सरचिटणीस यशवंत जडयार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - दिवाळीनंतरचे १५ दिवस अतिशय महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचं आवाहन

काही ठळक मागण्या

  • - मेमू रेल्वेला 200 किमी अंतराची मर्यादा आहे. त्यामुळे डहाणू ते पनवेल आणि पनवेल ते चिपळूण अशा दोन टप्प्यात चालवली 
  • - ज्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या फाटकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे
  • - डहाणू पनवेल ते चिपळूण दरम्याने मेमू रेल्वे सुरू करणे बाबत

Start Vasai to Sawantwadi Passenger Travel organizations with citizens insist

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start Vasai to Sawantwadi Passenger Travel organizations with citizens insist