

Blood Donation
ESakal
मुंबई : राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना स्वैच्छिक रक्तदान शिबिरांच्या आयोजनाबाबत सूचना जारी केल्या आहेत. महाविद्यालयांतील युवावर्ग हा रक्तदानाचा महत्त्वाचा स्रोत असून, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने रक्तदानात घट होते. त्यामुळे या काळात रक्तसाठा कमी होऊ नये, म्हणून विविध पातळीवर शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.