

Job Opportunities by Mahima organization
ESakal
मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांना परदेशात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अड्वान्समेंट्स - महिमा) स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना देश-विदेशातील रोजगाराची उपलब्धता आणि संधींची माहिती दिली जाईल.