राज्य शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून

तेजस वाघमारे
Friday, 20 November 2020

राज्य शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून  (शुक्रवार,  ता. 20) सुरू होत आहे.

मुंबई, ता. 20  : राज्य शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून  (शुक्रवार,  ता. 20) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा आजपासून सुरू होत आहे.

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; 24 तारखेला होणार सुनावणी

दरवर्षी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते, तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होते. या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात पुढील वर्गात प्रवेशही मिळतो. यंदा मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबल्या. या फेरपरीक्षेला दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 672 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेची विद्यार्थी संख्या घटली असून साधारण एक ते सव्वा लाख विद्यार्थी फेरपरीक्षा देतात.

महत्त्वाची बातमी : "चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांचे मार्चमधील परीक्षेचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष, करोनाची धास्ती यांमुळे परीक्षार्थींची संख्या काही प्रमाणात घटली असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाची बातमी : रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

state education board SSC and HSC repeater exams starts from today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state education board SSC and HSC repeater exams starts from today