नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकेवर प्रशासक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्याने स्थानिक निवडणुका रद्द केल्याने नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई-विरार महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई, ता. 28 : कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्याने स्थानिक निवडणुका रद्द केल्याने नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई-विरार महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा नवा 'A2a' अवतार समोर; येत्या काळात अधिक घातक ठरू शकतो कोरोना...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असे पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

औरंगाबाद महानगपालिकेची मुदत आज म्हणजेच, 28 एप्रिल रोजी संपत असून नवी मुंबई महानगपालिकेची मुदत 7 मे रोजी संपणार आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत 28 जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणे शक्य नाही, त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहे.

state election commission asks state government to appoint administrator on NMMC and VVMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state election commission asks state government to appoint administrator on NMMC and VVMC