Maharashtra State Election Commission : ‘स्थानिक’साठी प्रभाग रचना लवकर तयार करा; राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र
Maharashtra Election : सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रभाग रचना अंतिम न झाल्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य सरकारवर वेगाने कार्यवाही करण्याचा दबाव टाकला आहे.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश देत चार आठवड्यांत अधिसूचनाही निवडणूक आयोगाने जाहीर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.