

Mumbai Police Action On New Year Celebration
नितीन बिनेकर
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी, क्लब कार्यक्रम आणि सामाजिक समारंभांची जोरदार तयारी सुरू असतानाच, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीशी संबंधित बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. त्याअंतर्गत राज्यभरात २७ सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून, मुंबई महापालिका क्षेत्रात भेसळयुक्त व अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी २३ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.