

School bus
ESakal
मुंबई : राज्य सरकारने शालेय वाहतूक नियमांत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून प्रथमच शालेय बसचे भाडे अधिकृत नियमावलीच्या अंतर्गत आणले आहे. तसेच अनेक सुरक्षा उपाय अनिवार्य केले आहेत. सुधारित नियमांनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना (आरटीए) शालेय वाहतुकीचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.