esakal | कारशेडसाठी आरे, कांजूरमार्ग येथील जागेची चाचपणी, आणखी जमीनीबाबतही होणार तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

कारशेडसाठी आरे, कांजूरमार्ग येथील जागेची चाचपणी, आणखी जमीनीबाबतही होणार तपासणी

राज्य सरकारने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची तपासणी करण्यासाठी समिती गठित केली आहे.

कारशेडसाठी आरे, कांजूरमार्ग येथील जागेची चाचपणी, आणखी जमीनीबाबतही होणार तपासणी

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई: मेट्रो कारशेडसाठी दिलेली कांजूरमार्गची जमीन कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने राज्य सरकारने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची तपासणी करण्यासाठी समिती गठित केली आहे. ही समिती कांजूरमार्ग येथील जागा ही आरे येथील जागेपेक्षा अधिक सुयोग्य आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो कारशेडसाठी आणखी जमिनीची त्याचप्रमाणे आणखी वृक्षतोड करण्याची आवश्‍यकता आहे, काय याबाबत तपासणी करण्याची सुचना नगरविकास विभागाने केली आहे. 

आरे कॉलनीतील मेट्रो 3 च्या कारशेडला पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनेही वृक्षतोडीला विरोध केला. त्यामुळे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या जमिनीवर खासगी व्यक्तीने दावा केला आहे. त्यानुसार ही जमीनीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या प्रकल्पांच्या कामावर परिणाम झाला आहे. प्रकल्प लांबणीवर गेल्याने प्रकल्पाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा निश्‍चित करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नगरविकास विभागाने जारी केला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या समितीमध्ये प्रधान सचिव पर्यावरण विभाग, मुंबई महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण विभाग, परिवहन आयुक्त, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख के.व्ही.कृष्णा राव, एमएमआरडीए डायरेक्‍टर वर्क आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

सदर समितीची कार्यकक्षा

  • आरे येथील यापूर्वीची मेट्रो 3 च्या कारशेड डेपोकरीता प्रस्तावित केलेला आराखडा प्रकल्पाच्या डिझाईन कालावधीच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे काय ? तसेच गरजा पूर्ण करण्याकरिता आणखी जमिनीची आणि परिणामी आणखी वृक्षतोड करण्याची आवश्‍यता भासेल काय आची तपासणी करण्यात येणार आहे.
  • मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या मार्गिकांचे सुलभरित्या एकत्रिकरण करणे शक्‍य आहेत काय? यासाठी अंदाजित खर्च आणि कालावधी तपासणे.
  • कांजूरमार्ग येथील जागा ही आरे येथील जागेपेक्षा अधिक सुयोग्य आहे किंवा कसे, याची तपासणी करणे. 
  • मेट्रो 3, मेट्रो 4, मेट्रो 6 या मार्गिकांच्या डिझाइन कालावधीमध्ये या मार्गिकांवरील वाहतूक गरजा हाताळण्यासाठी कांजूर मार्ग येथील जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. 
  • मेट्रो कारशेडसाठी सुयोग्य पर्यायी जागेची निश्‍चिती करण्यासाठी सरकारला शिफारस करणे.
  • समिती एक महिन्यात सरकारला अहवाल सादर करेल.

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

State government constituted committee look alternative site metro car shed

loading image