
Mhada House
Esakal
मुंबई : सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, म्हणून राज्य सरकारने राज्यभरात म्हाडासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. ही जमेची बाजू असली तरी हा भूखंड घेण्यासाठी रेडिरेकनरच्या तब्बल अडीच पट दर मोजावा लागणार आहे. त्यासाठी पैसा आणायचा कुठून, जादा दराने भूखंड खरेदी केल्यास त्यावर तयार होणारी घरे परवडणारी ठरतील का, याची म्हाडाला चिंता लागली आहे.