
Worli Dairy land
ESakal
मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वरळी डेअरीच्या सुमारे साडेसहा हेक्टर जागेचा नियोजन आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे. त्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढत एमएमआरडीएला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या या जागेचा कायापालट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.