

Motilal Nagar Redevelopment Project
ESakal
मुंबई : मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना १,६०० चौरस फूट बिल्टअपऐवजी १,६०० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे घर देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत रहिवाशांनी सकारात्मक भूमिका घेतानाच आम्हाला पुनर्विकास हवा असल्याचे आज गोरेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.