

Mumbra Local Train Accident Update
ESakal
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकावर ९ जून रोजी झालेल्या भीषण ट्रेन अपघातानंतर मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांना दिलासा मिळाला आहे. इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगचा (आयआरआयसीईएन) अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (ता. ९) सांगितले.