मुंबईतील लोकल सेवा कधी सुरु होणार? यावर राजेश टोपे म्हणतात, नागरिकांची मागणी रास्त...

सुमित बागुल
Wednesday, 22 July 2020

नालासोपाऱ्यात नागरिकांच्या उद्रेकानंतर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावर राजेश टोपे यांचं विधान 

 

मुंबई : आज सकाळी नालासोपाऱ्यात प्रशासनाविरोधात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळला. एकीकडे ऑफिसेस सुरु करण्यात आले आहेत, मात्र ऑफिसला जायचं कसं हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे. दररोज खासगी वाहन नेणं अनेकांना परवडत नाही अशात मुंबईची लाईफलाईन सर्वसामान्यांसाठी अजूनही बंद आल्याने मोठ्या त्रासाचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. याबाबत महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सवाल केला असता त्यांनी मुंबईच्या लोकल सेवेबाबत भाष्य केलंय. 

मोठी बातमी - कोरोनाने पोलिसांना देखील बदललं, वाचा नक्की झालंय तरी काय...

नालासोपाऱ्यात आज मुंबईकरांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी रेल रोको केलं, या पार्श्वभूमीवर आता तर्री सरकार सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करणार का ? असा प्रश विचारला गेला. यावर राजेश टोपे यांनी उत्तर दिलंय. नागरिकांची मागणी रास्त असल्याचं राजेश टोपे म्हणालेत. मात्र कोरोनाच्या संवेनशील परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं काय? असा प्रतिसवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केला. मुंबईतील लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. 

मोठी बातमी -  उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या सोबतचा 'तो' खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं. ठाणे आणि पुण्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढली, त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात आला. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन केलं जाणार नाही असंही राजेश टोपे म्हणालेत. दरम्यान राज्य सरकार आता करणार असलेल्या अनलॉकमध्ये जिम आणि मॉल सुरु करण्याबाबत विचार सुरू असल्याचं टोपे म्हणालेत.

state health minister rajesh tope on commencing mumbais local train service   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state health minister rajesh tope on commencing mumbais local train service