

Chandrashekhar Bawankule
sakal
मुंबई : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या दरनिर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील तीन वर्षांत संपूर्ण राज्याचे मायक्रो झोनिंग (सूक्ष्म क्षेत्र रचना) करण्यात येणार आहे. यामुळे जमिनींचे रेडीरेकनर दर अधिक अचूक आणि वास्तववादी होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. दरम्यान, ‘महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६’ आज सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले.