

Dahisar Toll Naka Shift In Vasai
ESakal
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : दहिसर टोलनाका स्थलांतराच्या जागेवरून एकीकडे वाद निर्माण झालेला असतानाच हा टोलनाका वसई खाडीपुलापलीकडे वसई विरार महापालिकेच्या हद्दीत स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्याला मान्यता मिळण्यासाठी स्थलांतराचा प्रस्ताव महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला आहे. यासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली आहे.