esakal | कोरोना रिपोर्टच्या वेळेबाबत आयुक्तांकडून खासगी लॅबला विशेष सूचना

बोलून बातमी शोधा

कोरोना रिपोर्टच्या वेळेबाबत आयुक्तांकडून खासगी लॅबला विशेष सूचना

मुंबईत कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येसोबत वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोरोना रिपोर्टच्या वेळेबाबत आयुक्तांकडून खासगी लॅबला विशेष सूचना
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येसोबत वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. हे रोखण्यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले असून पालिकेने आता कोरोना रूग्णांच्या उशीर झालेल्या अहवालाबाबत खासगी लॅबवर कडक कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेने सर्व खासगी लॅबला दुपारनंतर झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल रात्री ऐवजी सकाळी देण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेचा फायदा म्हणजे रूग्णांना लवकरच रुग्णालयांमध्ये बेड मिळतील आणि त्यांचे उपचार सुरू होऊ शकेल. 

खासगी लॅबमधून कोरोना चाचणीच्या अहवालाला उशीर झाल्यास त्यांना त्याबद्दल पालिकेला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. बैठकीत महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही संबंधित विभागांना या संदर्भात कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या आयुक्तांनी पुन्हा एकदा खासगी लॅबच्या लोकांना 24 तासांत सकारात्मक अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासह आयुक्तांनी दुसर्‍या दिवशी पहाटे 6 वाजता दुपारी दोननंतर होणाऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल देण्याचे निर्देशही दिले आहेत. आतापर्यंत दुपारी झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल लॅबमधून दुसर्‍या दिवशीच्या रात्री 12 सुमारास येत होता. यामुळे रूग्णांना बेड पुरवण्यात वॉर्ड वॉर रूममधील लोकांना समस्या येत होत्या. तर, रूग्णालयात बेड्स न मिळाल्यामुळे त्यांचे उपचार उशीरा सुरू होऊन त्याचे परिणाम गंभीर होतात. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, सकाळी लवकर अहवाल मिळाल्यास रुग्णांना वेळेवर बेड मिळणे सोपे होईल.

हेही वाचा- चिंताजनक बातमी: मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर शिल्लक

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Test report six oclock next day bmc commissioner instructed private lab