लालपरी निघाली, ST सेवा पूर्ण क्षमतेने सुरु; मात्र प्रवासासाठीचे महत्त्वाचे नियम आधी जाणून घ्या

सुमित बागुल
Friday, 18 September 2020

केवळ प्रवेशनांनाच नाही तर राज्य परिवहन महामंडळाला देखील काही नियम पाळावे लागतील.

मुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊन नंतर सर्व काही ठप्प झालं. कंपन्या, उद्योगधंदे, कामकाज, सर्व मंदावलं. या सर्वात महाराष्ट्राचं आर्थिक गणित देखील बिघडलं. आता अनलॉक सुरु झालंय खरं, मात्र कोरोनाची टांगती तलवार मानेवर कायम आहे. अजूनही व्यवसाय, उद्योगधंदे आणि सामाजिक जीवन पूर्वपदावर आलेलं नाही. अशात राज्य सरकारकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे राज्यातील लालपरी पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची. 

आजपासून राज्यातील ST सेवा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी देण्यात आलीये. म्हणजेच आता एका आसनावर एक असा नियम नसणार आहे. सरकारकडून याबाबाची परवानगी जरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मिळाली असली तरीही यासाठी आधीचे काही नियम मात्र पूर्णपणे पाळायलाच लागणार आहेत. 

महत्त्वाची बातमी : आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका
 

काय आहेत हे नियम : 

सरकारकडून पूर्ण क्षमतेने ST सेवा सुरु करताना ST बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वतःकडे सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. सोबतच प्रवासादरम्यान मास्क देखील अनिवार्य असणार आहे. या दोन गोष्टींशिवाय प्रवाशांना ST बसमधून प्रवास करता येणार नाही.  केवळ प्रवेशनांनाच नाही तर राज्य परिवहन महामंडळाला देखील काही नियम पाळावे लागतील. यामध्ये सर्व बसेस वेळच्या वेळी निर्जंतुकीकरण करूनच मार्गस्थ केल्या जाव्यात या सूचना देण्यात आल्यात.   

राज्यात ट्रेन्स अजूनही पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या ST ला देखील मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. टप्प्याटप्प्याने ST सेवा सुरळीत करताना या आधी ५० टक्के आसन क्षमता ठेऊन बसेस सुरु झाल्यात. मात्र आता प्रत्येक सीटवर दोन व्यक्ती बसू शकतात आणि ST सेवेस पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 

state transport gets permission to run buses with full capacity with mask and sanitizer mandatory


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state transport gets permission to run buses with full capacity with mask and sanitizer mandatory