Shivaji Maharaj Statue : 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' निर्माण करणारी कंपनी मालवणमध्ये उभारणार शिवरायांचा तब्बल 60 फुटी पुतळा!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. हा ६० फूट उंचीचा पुतळा ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात येणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj Statueesakal
Updated on
Summary

या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा मत्स्य विकास मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी घेतला.

मुंबई : मालवण येथील राजकोट येथे गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ (Statue of Unity) हा भव्य पुतळा उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com