esakal | सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

पाण्याची वाफ घेतल्यानेही कोरोनाच्या रुग्णांना त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात आल्याने विश्वास ऑर्किड कॅन्सर ट्रस्टने कडून स्टीमर मशीनचे वाटप करण्यात येत आहे.

सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना लस किंवा त्यावर ठोस उपचार नसल्याने सध्या रुग्णाच्या प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच लक्षणांनुसार अन्य औषधांच्या प्रयोग करणे सुरू आहे. त्यातच सध्या होमिओपॅथी औषधांचा प्रतिकाशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होऊ लागल्याने मुंबईकरांना होमिओपॅथीचे औषधांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र त्यातच पाण्याची वाफ घेतल्यानेही कोरोनाच्या रुग्णांना त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात आल्याने विश्वास ऑर्किड कॅन्सर ट्रस्टने कडून स्टीमर मशीनचे वाटप करण्यात येत आहे. मात्र या थेरपी साठी पालिकेकडे परवानगी मागितली असता, याबद्दल अजूनही परवानगी प्रतीक्षेत असल्याबद्दल डॉक्टरांकडून काहीशी नाराजी  व्यक्त करण्यात आली.

खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष... 

कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडू लागल्याने लांबून येणारे अनेक रुग्ण येणे बंद झाले. मात्र एचवनएनवन किंवा सार्स सारख्या आजारात साध्या वाफेनेही फायदा होत असल्याचे डॉक्टर असलेल्या दिलीप भोसले आणि रुसी बल्ल्या यांचे म्हणणे आहे. त्यातच दुबईहून आलेल्या काही नागरिकांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या रुग्णांना वाफ घेण्यास सुचविले. दोन दिवसात याची लक्षणे दिसणे बंद झाल्याचे रुग्णांकडून त्यानां सांगण्यात आले. आणि त्यानंतर वाफेचा फायदा होऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी कोरोनासाठी काळजी घेण्यासोबत वाफ घेण्यास सुचविले. त्यानंतर आपल्या ट्रस्टकडून त्यांनी रुग्णालये,पोलीस ठाणे, रुग्ण आणि कोरोनाचा संसर्ग असलेल्या विभागात वाफेच्या मशीनचे वाटप सुरू केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा...

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून त्यांनी कोरोना संसर्ग असलेल्या विभागासह, कोरोना रुग्ण आणि पोलीस तसेच डॉक्टरांना करण्यात येणारे या माशीनचे वाटप वाढवले.ऑर्किड कॅन्सर ट्रस्टकडून तब्बल 3000 हुन अधिक ही पाण्याची वाफ घेण्याची (स्टीमर) मशीन वाटप करण्यात आली. त्यासंदर्भात आम्हीही  डॉक्टर, पोलीस आणि कोरोना संसर्ग असलेल्या भागातील नागरिकांना विचारले असता ज्यांना लक्षणे होती त्यांची लक्षणे कमी झाली काहींची लक्षणेही दिसणे बंद झाले. वाफ घेत असल्या पोलीस आणि डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांना बाधा झाली नसल्याचे डॉ. भोसले सांगतात. 

धारावी , खार, सांताक्रूझ, वर्सोवा, जुहू, वाकोला अशा पोलीस ठाण्यात ही अशा वाफेच्या मशिन पुरविण्यात आल्या. त्यानंतर पोलीस दलातून  3500 वाफेच्या मशीन घेण्यात आल्या. त्यानंतर केईएम रेसिडेंट डॉक्टर, सायन, कूपर,कांदिवली सिसिव्ही, घाटकोपर राजावाडी आशा ठिकाणी सुमारे 1500 हुन अधिक मशीन पुरविण्यात आल्या. त्यामुळे फायदा झाल्याचे डॉक्टर आणि नर्स सांगतात. त्याचसोबत काही कोरोना रुग्ण, कोरोनाची लक्षणे असलेले नागरिक यांनीही वाफ घेतल्याने फायदा होत असल्याचे सांगितले आहे.
 

loading image
go to top