
मिरा रोड : मिरा रोडमधील एकाच घरातील ५ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर दखल घेत विभागातील गर्दीला आळा घालण्यासाठी एसआरपीएफला (राज्य राखीव पोलिस दल) पाचारण केल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.
देशात लॉकडाऊन करून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन मिरा-भाईंदर महापालिका व स्थानिक पोलिसांमार्फत सतत केले जात आहे. तरीही शहरातील काही टवाळखोर मात्र खुलेआम रस्त्यावर हिंडताना दिसत असून त्यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे. तरीही रस्त्यावरील गर्दी आटोक्यात येत नसल्याने आयुक्तांनी शहरातील दुचाकींना पेट्रोलचा पुरवठा न करण्याचे आदेश पेट्रोलपंप चालकांना दिले.
तरीही काही ठिकाणी दुचाकीवरील भटकंती अद्यापही थांबलेली नाही. अखेर आयुक्त चंद्रकांत डांगे यांची स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या चर्चेत लोकांच्या अनावश्यक भटकंतीवर आळा घालण्यासाठी थेट सीआरपीएफला पाचारण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या काही तुकड्या दोन दिवसांत शहरात दाखल होतील.
This step will be taken in Mira-Bhayander to stop the crowd ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.