esakal | स्टेथोस्कोप होणार हद्दपार; महापालिकेची आयडीयाची कल्पना
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेथोस्कोप

स्टेथोस्कोप होणार हद्दपार; महापालिकेची आयडीयाची कल्पना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : डॉक्टरकडे गेल्यावर दिसणारे स्टेथोस्कोप भविष्यात हद्दपार होणार आहे. डॉक्टरला स्टेथोस्कोप कानाला न लावता रुग्णाचे निदान करता येणार आहे. तर,मधुमेह होण्यापुर्वीच समजणार आहे. हे आता जरी परीकल्पना वाटत असली तरी येत्या काळात उपचार पध्दतीत अमुलाग्रह बदल घडवणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत मुंबईत प्रयोग सुरु आहेत. महानगर पालिकेच्या उपक्रमात हे प्रयोग सुरु आहेत.

स्टार्ट अपना चालन देण्यासाठी महानगर पालिकेने सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्र्रपोन्योरशिप कॉन्सील (स्माईल) ही सुविधा सुरु केली आहे. या इनक्यूबेशन केंद्रात पाच नव उद्यमींची पहिली तुकडी कामकाज करण्यासाठी सज्ज झाली आहे. या केंद्रांमार्फत नागरीकांचे जिवनमान उंचविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. यात पहिले पाच तंत्रज्ञान विकसीत करण्यास प्राधान्य देण्यात आले आहेत.याच प्रामुख्याने वैद्यकिय दृष्ट्या तंत्रज्ञान आहे त्याच बरोबर नागरी सुविधांबाबतही प्रयोग सुरु आहेत.

बायोनिक होप या तंत्रज्ञानात कृत्रिम हात तयार केलेला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या दृष्टीने अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत करतील. हा कृत्रिम हात प्रयोगिक तत्वावर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांनाही आवश्‍यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येतील.

ब्ल्यू टूथ स्टेथोस्कोप या तंत्रज्ञानत डॉक्टरला रुग्णांच्या जवळ न जाताही स्टेथोस्कोपने निदन करता येणार आहे. हे वायरलेस स्टेथोस्कोप ब्ल्यू टूथने मोबाईलशी जोडले जाणार आहे. रुग्णाने हे स्टेथोस्कोप स्वत:च्या शरीरावर ठेवल्यास डॉक्टरच्या मोबाईलवर त्याच्या नोंदी दिसणार आहे.

न्यूरोथेरपी स्कि्नर उपकरणात मधुमेह पुर्व टप्प्यातच संशयीत रुग्ण लक्षात येणार आहे. जेणेकरुन आजार गंभिर तर होणारच नाही शिवाय संशयीत रुग्णाला वेळीस मधूमेहावर नियंत्रण मिळता येईल. कोविडच्या विविध प्रकारांचे निदान करण्यासाठी महानगर पालिकेने गुणसुत्रीय(जिनोमीक)प्रयोगशाळा सुरु केली आहे. भविष्यात सर्वच संसर्गजन्य आजारांचे निदान वेगाने करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होईल. तसेच,क्षयरोग निदानासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न आहेत. घनकचरा व्यवस्थापन,पाणी,सांडपाणी या विषयांमध्ये व्यवस्थापन करण्याबाबतही तंत्रज्ञान विकसीत केले जात आहे.

loading image
go to top