कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईतही करारावर नर्सची भरती होणार, पण...

nurses
nurses

मुंबई : मुंबई महापालिकेने आगामी तीन महिन्यांकरीता डॉक्टर आणि नर्सची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. त्यांना तीन महिन्यांसाठी करारबद्ध करुन घेण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने होम केअर म्हणून जाणाऱ्या नर्सबरोबर संपर्क साधला आहे. त्यांना तीन महिन्याकरीता करारबद्ध करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे तसेच त्यांना महिना तीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काही नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण त्याचबरोबर विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या केवळ आरोग्य सेवेत कायम स्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच केंद्र सरकारने 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे.

कोणत्याही रुग्णालयात कामास नसणाऱ्या पाच हजार नर्स मुंबईत आहेत. ते केवळ होम केअरचे काम करतात. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांना फारसे काम नाही. त्याहीपेक्षा होम केअर करणाऱ्या नर्स प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील आहेत. अनेक नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण आमच्या प्रवासाची व्यवस्था काय अशी विचारणा केली आहे. मुंबई परिसरातील अनेक नर्स उपनगरात राहतात. त्यामुळे घरी पोहोचण्याची सुरक्षित व्यवस्था असावी अशी त्यांची मागणी आहे. 

मुंबई महापालिकेने खाजगी डॉक्टरांनाही तात्पुरते सेवेत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनाही तीन महिने करारबद्ध करण्याची तयारी दाखवली आहे. चांगले मानधन देण्याचीही तयारी दाखवल्यानंतरही खाजगी डॉक्टरांचा प्रतिसाद खूपच कमी आहे. आमची वैयक्तिक प्रॅक्टीस सोडून तीन महिने कसे येणार अशी विचारणा अनेक खाजगी डॉक्टर करीत आहेत.

to stop Corona, a nurse will also be recruited on contract in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com