esakal | काळ्या मातीत फुलली लालेलाल स्ट्रॉबेरी 
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या मातीत फुलली लालेलाल स्ट्रॉबेरी 

आवंढे येथील आशीष समर्थ या तरुणाने चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते, हे दाखवून दिले. वाडा तालुक्‍याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. कोलमला मागणी चांगली असली, तरी निसर्गाचा लहरीपणा, यांत्रिक उपकरणे, औषधे, बी-बियाणे, मनुष्यबळाचे वाढलेले दर लक्षात घेता आता भातशेती न परवडणारी झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी आता इतर पिकांचे उत्पादन घेताना दिसत आहे. 

काळ्या मातीत फुलली लालेलाल स्ट्रॉबेरी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : आवंढे येथील आशीष समर्थ या तरुणाने चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते, हे दाखवून दिले. वाडा तालुक्‍याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. कोलमला मागणी चांगली असली, तरी निसर्गाचा लहरीपणा, यांत्रिक उपकरणे, औषधे, बी-बियाणे, मनुष्यबळाचे वाढलेले दर लक्षात घेता आता भातशेती न परवडणारी झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी आता इतर पिकांचे उत्पादन घेताना दिसत आहे. 

वाड्यातील शेतकरी भातशेतीनंतर फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, मत्स्यशेती, कुक्कुटपालन आदीकडे वळले आहेत. तालुक्‍यातील जमीन विविध पिकांस उपयुक्त असल्याने येथे कांदा, बटाटा, केळी, कोबी, फ्लॉवर, घोसाळे, वाल, पापडी, हळद, कांदा, आले, डांगर, तोंडली, गवार, पडवळ, घेवडा, चेरी, सफेद कांदा, लाल कांदा, वांगी आदी पिके घेत आहेत. नाशिककडे होणारी ही पिके आता काही प्रमाणात वाड्यातही येऊ लागली असून तालुक्‍यातील आवंढे येथील रुईया फार्ममध्ये आशीष समर्थ या तरुणाने चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन यशस्वीरीत्या घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते, हे दाखवून दिले आहे. 

ही बातमी वाचा ः मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा
सेंद्रीय शेतीवर भर 
आशीष समर्थ तरुण शेतकऱ्याने सात ते आठ गुंठे जागेत सात ते आठ हजार ट्रॉबेरीची रोपे लावली आहेत. संपूर्ण पिकाला ठिबक सिंचन केले आहे. डिसेंबर ते मार्चअखेरपर्यंत हे पीक चालणार आहे. येथील वातावरण स्ट्राबेरीला पोषक असल्याने हे पीक चांगले बहरले आहे. पिकाला शेणखत, गोमूत्र, जीवामृत, दशपाणी अर्क, गांडुळ खत अशी सेंद्रीय खते वापरण्यात आले आहे. एका झाडाला 80 ग्रॅम उत्पादन निघत असल्याचे आशीष समर्थ यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीपासून जेली आणि जाम बनवता येतो, असे आशीष यांनी सांगितले. स्ट्राबेरीला गोडपणा, सुगंधी व आंबटपणा असल्याने ही फळे महाबळेश्वरपेक्षाही अधिक चवीला रुचकर असल्याचे आशीष समर्थ यांचे म्हणणे आहे. 


वाडा तालुक्‍याची शेती ही विविध पिकास उपयुक्त असल्याने देशी पिकांबरोबरच ब्रोकोली, चायनीज, झुकीनी ही विदेशी पिकेही येथे उत्तम पद्धतीने येऊ शकतात. स्ट्राबेरी हे पीक आम्ही गेल्या पाच वर्षांपासून घेत असून ते वाड्याच्या मातीत उत्तम पद्धतीने येते. महाबळेश्वरपेक्षाही चवीला जास्त रुचकर असल्याचे मला वाटते. 
- आशीष समर्थ, शेतकरी, रुईया फार्म हाऊस, आवंढे 
 

 
 

loading image
go to top