Stray Dogs Attack
sakal
ठाणे - शहरांपुरता मर्यादित राहिलेला भटक्या श्वानांचा प्रश्न आता ग्रामीण भागातही गंभीर बनला आहे. रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या श्वानांच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना, त्यांच्या व्यवस्थापनासाठी ठोस यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन ग्रामीण भागात चार ते पाच एकर जागेवर स्वतंत्र श्वान निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली.