

Chandrashekhar Bawankule
sakal
मुंबई: ‘‘नाशिकमधील‘म्हाडा’ गृह प्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या बिल्डरांची गय केली जाणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे सोपवू,’’ असा कडक इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना भू माफियांना दिला.