मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर जोरदार कारवाई, आतापर्यंत गोळा केला 'इतक्या' रुपयांचा दंड

समीर सुर्वे
Friday, 4 September 2020

मास्क न वापरणाऱ्यांकडून महानगर पालिका 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करत आहे. सुमारे दहा हजार नागरिकांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला असून अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातून सर्वाधिक 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई: मास्क न वापरणाऱ्या 2 हजार 798 लोकांकडून महानगर पालिकेनं तब्बल 27 लाख 48 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून महानगर पालिका 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करत आहे. सुमारे दहा हजार नागरिकांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला असून अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातून सर्वाधिक 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मरीन लाईन्स, गिरगाव परिसरातून 4 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारनं 9 एप्रिल पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र,आजही अनेक जण मास्क न वापरता फिरत असतात. अशाकडून 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेनं 9 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत 27 लाख 47 हजारांचा दंड वसूल केला आहे.  कांदिवली आर दक्षिण प्रभागातून 4 लाख 21 हजार आणि मरिन लाईन्स, गिरगाव सी प्रभागातून 4 लाख 8 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

सर्वाधिक दंड हा मे महिन्यात वसूल करण्यात आला. या महिन्यात तब्बल 9 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 953 लोकांकडून हा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जुन महिन्यात 589 लोकांकडून 5 लाख 88 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात 523 लोकांकडून 4 लाख 82 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात मुंबईत कोविडचा संसर्गाचा वेग वाढू लागला होता. वारंवार होणाऱ्या कारवाईमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती होऊन मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले.तसेच,नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे. 

Strict action against not wear masks in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action against not wear masks in Mumbai

Tags
टॉपिकस