हुक्का पार्लर सुरु दिसलं तर पोलिसांवरच होणार कारवाई, अनिल देशमुखांचं मोठं विधान

हुक्का पार्लर सुरु दिसलं तर पोलिसांवरच होणार कारवाई, अनिल देशमुखांचं मोठं विधान

मुंबई, ता. 2 : वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक आणि महादेव जानकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री  देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे शिवसेनेच्या मंत्र्यांवरच आरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती आणि तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

शिवसेनेचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी संबंधित पोलिस अधिकार्याविषयी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सभागृहात तक्रार केली. कोरोनाच्या काळात क्रिकेट सामन्यांसाठी परवानगी देणे आणि सरकारी अधिकारी असताना राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या या अधिकाऱ्याला शिवसेनेचेच मंत्री पाठिशी घालत असल्याचा थेट आरोप रामदास कदम यांनी सभागृहात केला.

शिवसेनेचे गृहराज्य मंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत, तूमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकार्यावर कारवाई करा असे आव्हान त्यांनी देशमुख यांना केली.

विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

strict action will be taken on the hukka parlors if found open action will be taken on police officers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com