
मुंबई, ता. 23 : राज्यात कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. पण लॉकडाउन हा खरंतर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य तो विचार करून कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिला.
राज्यात लाँकडाऊन जाहीर करायची अथवा नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठवड्याभरात घेतील, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "मला असे वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करून ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चर्चा करून पत्रक काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील.
दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो", असं राजेश टोपे म्हणालेत.
महत्त्वाची बातमी : मेघगर्जनेसह वीज कडाडत असल्यास काय कराल, काय टाळाल ? कायम कामी येणारी माहिती
राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे टोपे यावेळी म्हणाले.
strict decision regarding mumbai local will be taken rajesh topes statement about lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.