क्रिकेट खेळताना थकवा आला म्हणून रणजीत खाली बसायला गेला आणि तिथेच...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

शहरातील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील २२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. रणजीत रामभवन पाल असे त्याचे नाव आहे. 

कर्जत : शहरातील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील २२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. रणजीत रामभवन पाल असे त्याचे नाव आहे. 

मोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज..

 

कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी बॉक्‍स क्रिक्रेट स्पर्धेत खेळताना थकवा आल्यामुळे रणजीत खाली बसला आणि तेथेच कोसळला. प्राचार्य मधुकर लेकरे आणि विकास पाटील यांनी त्याला तातडीने शुभम रुग्णालयात नेले. प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्‍टर नितीन चव्हाण यांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

काय झालं नक्की ते वाचा ४०० शाळांतील पालकांचा हात कपाळाला...

रणजीत याच्या आकस्मिक निधनामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुर्ला येथे राहणारा रणजीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन्स शाखेत अखेरच्या वर्षात शिकत होता.  

Student dead during playing Cricket


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student dead during playing Cricket