CET परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एसटी' ने प्रवास करण्याची मुभा, 1500 बसेस उपलब्ध

भाग्यश्री भुवड
Thursday, 1 October 2020

1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणाऱ्या सीईटी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीने प्रमुख बस स्थानकातून 1500 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

मुंबई: 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणाऱ्या सीईटी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीने प्रमुख बस स्थानकातून 1500 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

त्यासंबंधीचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान दोन सत्रात (सकाळी/दुपारी) होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस त्यांच्या जिल्हानिहाय संख्येनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अधिक वाचाः  बॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय? NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा
 

पहिल्या टप्प्यात 63 हजार 284 विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहेत, त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी स्थानिक आगारातून बसेस उपलब्ध करून देण्यात येताहेत. अर्थात, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर प्रवासात विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. याबरोबरच प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेल्या बसेस या स्वच्छ धुवून निर्जंतूक केलेले असतील, असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

------------

(संपादनः पूजा विचारे)

Students appearing CET exams able travel by ST 1500 buses available


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students appearing CET exams able travel by ST 1500 buses available