कोरोना क्वारंनटाईनमध्ये विद्यार्थी हेल्पलाईनवर सातत्याने विचारतायत 'हे' प्रश्न....

कोरोना क्वारंनटाईनमध्ये विद्यार्थी हेल्पलाईनवर सातत्याने विचारतायत 'हे' प्रश्न....

मुंबई : कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाने विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द केल्या तर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या परिक्षाबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे परिक्षा कधी होतील, त्याचे निकाल कधी लागणार परिक्षेते स्वरुप कसे असणार असे अनेक प्रश्नांचा विद्यार्थ्यांच्या मनात कल्लोळ उठला आहे. त्याहून पुढे आपल्या करिअरचे भवितव्य काय या चिंतेने विद्याथर्यांना ग्रासले आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या मनावर या गोष्टींचा ताण वाढत असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. 50 ट्कके विद्यार्थी याच मानसिकतेचा सामाना करत आहे, ही बाब  हेल्पलाईनवर विद्यार्थ्यांतून दिलेल्या प्रतिसादावरून लक्षात आली.

राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन टेलिफोनिक तसेच व्हाट्सअॅपच्या माध्यमातून सुरू आहे. हेल्पलाईन वापर करुन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनावर आलेल्या ताणाबबात मानसोपचार तज्ज्ञांची चर्चा केली. यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना सुचवा अशी मागणी केली. स्वतःच्या उच्च शिक्षणाचे काय होणार, यातून आपल्याला कसा मार्ग मिळणार, ही परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत काय करायचे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना मनात उमटत आहे. . परंतु या सर्व परिस्थितीचा विचार करताना त्यांवरील मानसिक ताण वाढला आहे, अशी महत्त्वाची नोंद मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवली. या विचारापासून दूर सारण्यासाठी ते स्वतःला ऑनलाईन गेमिंग, वेबसिरिज अशा स्क्रीन टाईममध्ये गुंतवत आहे. परंतु यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढला पण रोजची जीवनशैली विस्कळीत झाली. 

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना WhatsApp माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली. विद्यार्थ्यांना या हेल्पलाईन चांगला प्रतिसाद दिला. हेल्पलाईन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबबत प्रा.प्रतिका पेठारे म्हणाल्या, महाविद्यालयात अंतिम वर्षाला असणार्या विद्यार्थ्यांनी परिक्षा कधी होणार, निकाल आणि त्यानंतर परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे याबाबत संवाद साधला. आजची परिस्थिती कधी बदलणार याबद्दल काही सांगता येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितेचे सावाट निर्माण झाले. त्याला त्यांनी कसे समाोरे जावे याबद्दल समुपदेशन केले जाते. हे अनिश्चिता त्यांच्यावर मनावरील ताण वाढवत आहे. आलेल्या केसेचा अनुभवाबद्दल प्रा. पेठारे सांगतात, अनेक विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. त्यातील अनेकांची निवड झाली. परंतु पुढे संबंधित विद्यापीठ, इन्स्टिट्यूटने त्यांना संपर्क केला नाही. तसेच पुढील प्रक्रिया काय असेल या सर्व बाबींने ते चिंतेत आहेत. याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी मोबाईल, वेबसिरिज, गेमिंग, सोशल मिडिया, टीव्ही शो अशा गोष्टीमध्ये जास्त वेळ घालवत आहे. ते मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. यासाठी ऑनलाईन फ्री कोर्सबाबत त्यांना माहिती देणे, काही वर्कशॉप घेणे अशा उपाययोजन करत आहोत. 

क्वारंटाईनममुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली विस्कळीत झाली. ज्यांच्या परिक्षा अजून झाल्या नाही त्याबद्दल त्यांना चिंता वाटते. घरीच असल्याने किती सारखा सारखा अभ्यास करायचा असा प्रश्न पडतो. तर काहीकडे घरात अनेक माणस असल्याने अभ्यास करण्यास अडचण येते. अनेकांना झोपेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती ससून जनरल रुग्णालच्या क्लिनिकर मानसशास्त्र विषयाच्या प्रा. दीपीका पाटील यांनी दिली. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून जनरल रुग्णालय, बी.जे. शासकीय मेडिकल महाविद्यालयाचा मनोचिकित्सक विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने मनसंवाद हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवर विद्यार्थ्याकडून समुपदेशनासाठी आलेल्या फोन कॉल्स मधून आलेल्या असे आढळले की, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात जी अनिश्चिता निर्माण झाली. त्यामुळे ते तणावग्रस्त आहे. तणाव दूर करण्यासाठी आपला वेळी स्क्रीन टाईममध्ये घालवतात. त्यामुळे जीवनशैली बदलून गेली आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, सतत मोबाईलवर वेळ घालवणे असे प्रकार दिसून येतात. परंतु सतत मोबाईल, लॅपटॉपवर वेळ घालवल्याने मेलाटोनिन या झोपेशी निगडिच संप्रेरकावर परिणाम करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी दोन तास या सर्वांपासून दूर राहिले पाहिजे. तरच झोप नियमित होईल, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला.

students are thinking about their future see how students are feeling during this lockdown 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com