esakal | परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका, कोणीही असलात तरीही सोडणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका, कोणीही असलात तरीही सोडणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका, कोणीही असलात तरीही सोडणार नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  अख्खा देश कोरोना विषाणूसोबत संघर्ष करत असताना महाराष्ट्र देखील कोरोनाशी लढतोय. सरकारने सर्वच क्षेत्रातील नागरिकांची खबरदारी आणि काळजी घेतली असून परप्रांतीय मजुरांच्या बाबतही राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. मात्र त्यांच्या भावनांशी खेळून कोणी राजकारण करत असेल.  कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करेल,  तर तो कोणीही अन कितीही मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सोडला जाणार नाही. असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

मोठी बातमी - समुद्रातील लाल 'शेवाळ'पासून तयार होणार कोरोनाचं औषध? या भारतीय कंपनीकडून शोध सुरु

चौदा तारखेनंतर लॉकडाऊन उठेल आणि रेल्वे सुरू होतील असं कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यातून बांद्रा आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांवर परप्रांतीय मजुरांची गर्दी जमा झाली आणि लाॅकडाऊनची आचारसंहिता मोडल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की "परप्रांतीय मजुरांनो आहात तेथेच रहा. तुम्हीही या देशाचे नागरिक असल्याने महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे. तुम्हाला घरी जाण्यासाठी जरूर आतुरता असेल. त्यासाठी केंद्र सरकार सोबत रेल्वे सुरू करण्याची आम्ही विनंती देखील केली होती पण आता तीन मे पर्यंत हा बंदी कायम राहणार असल्याने तुम्ही कोणाच्याही गैरसमजाला बळी पडू नका.

राजकारण करायला अख्ख आयुष्य पडले असून अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्र ते खपून घेणार नाही. असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. दरम्यान राज्य सरकारने महाराष्ट्रात देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक चाचण्या केल्या असून संशयास्पद रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात जीवनावश्यक वस्तूची कुठेही कमतरता नसून सुरळीत पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनीही घाबरून जाऊ नये आणि परप्रांतीय कामगारांनीही धीरोदात्तपणे रहावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

... तर महाराष्ट्र दिशा देईल

आज पर्यंत अनेक संकटावर महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मी स्वतः अनेक शास्त्रज्ञांची व  संशोधकांशी चर्चा करत असून कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्लाजमा हे तंत्रज्ञान वापरण्याची ची परवानगी केंद्राला मागितली आहे. याशिवाय पोलिओची लस देखील या आजारावर परिणामकारक ठरू शकते काय याच्या चाचण्या करण्याच्या सूचना विविध संशोधकांनी केलेल्या आहेत. त्याबाबत ही केंद्राला विनंती केली असून अशा परवानग्या मिळाल्या तर कदाचित कोरोणा वरती रामबाण उपाय शोधण्यात महाराष्ट्राला यश मिळेल आणि हे यश देशासाठीच नव्हे तर जगासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

maharashtra cm uddhav thackeray on badra mob gathering incident

loading image
go to top