Taekwondo Belt Exam : तायक्वांडो स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जोरदार परफॉर्मन्स; नेरुळमध्ये रंगतदार स्पर्धा
Youth Skills Showcase : नेरुळ येथील अल्ट्रा इन्स्टीक्ट स्पोर्ट अकादमीत झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तायक्वांडोचे अफलातून कौशल्य सादर केले. ४ ते १६ वयोगटातील ४६ विद्यार्थ्यांना विविध श्रेणीतील बेल्ट आणि स्पर्धा विजेत्यांना सन्मान मिळाला.
नवी मुंबई: नेरुळ येथे रविवारी (ता.२२) तायकांडो बेल्ट परिक्षा तसेच स्पिड किक स्पर्धा पार पडली. नेरुळच्या अल्ट्रा इन्स्टीक्ट स्पोर्ट अकादमीत झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तायक्वांडोतील आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.