विद्यार्थ्यांचे मतदान केंद्रांबाहेर नागरिकांना सहकार्य

विद्यार्थ्यांचे मतदान केंद्रांबाहेर नागरिकांना सहकार्य

कल्याण (वार्ताहर) : एसएसटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सोमवारी (ता. २०) लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राबाहेर नागरिकांना सहकार्य करत जबाबदार नागरिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले. यात त्यांनी मतदारांना मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे समजावून सांगितली. तसेच वृद्ध आणि अपंग मतदारांना मतदान कक्षापर्यंत व्हीलचेअरवर पोहोचवण्याची ही मदत केली. यासोबतच मतदान केंद्रांत स्वच्छता राखण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केलेत. मतदानाच्या पूर्वी या स्वयंसेवकांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांत पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती केली. एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांच्या या समर्पण आणि सामाजिक जबाबदारीचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com