विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होणार; ...'यांना' शाळेत हजर होण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होणार; शिक्षकांना शाळेत हजर होण्याच्या सूचना

विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तुंचा पुरवठा वेळेत करता यावा, यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांसह अन्य कामगारांना 15 जूनपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षण विभागाने केल्या आहेत. 

विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होणार; ...'यांना' शाळेत हजर होण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तुंचा पुरवठा वेळेत करता यावा, यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांसह अन्य कामगारांना 15 जूनपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने केल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? दुहेरी हत्याकांडानं हादरलं मीरा रोड! पाण्याच्या टाकीत दोन बार कर्मचाऱ्यांचे मृतदेह... 

मुंबई महापालिका शाळांत तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून वह्या, पुस्तके, पेन, पॅन्सिल ,बूट अशा 27 शालेय वस्तुंचा पुरवठा करण्यात येतो. परंतु कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सगळीच कामे ठप्प आहेत. अनेक शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जे गावी अथवा मुंबई बाहेर गेलेले मुख्याध्यापक , शिक्षक व कर्मचारी यांनी 15 जूनपासून शाळेत उपस्थित रहावे. जेणे करुन विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन, पॅन्सिल रबर आदी वस्तुंचे लवकर वाटप करणे शक्‍य होईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. 

ही बातमी वाचली का? सीबीएसई, सीआयएससीईच्या परिक्षा लांबणीवर टाकण्याची महाराष्ट्राची सूचना

शिक्षक 15 जूनला गैरहजर असल्यास उन्हाळी वेतन कापले जाणार नाही. कोरोनामुळे काही शिक्षक अडकले असून आता ये - जा करण्याची सोय उपलब्ध असल्याने 15 जूनपूर्वी शालेय कर्मचारी हजर होणार आहे. 
- महेश पालकर, शिक्षण अधिकारी. 

पालिका शाळा 
प्राथमिक शाळा - 1,038 
माध्यमिक शाळा - 149 
एकूण विद्यार्थी - 2,96,815 
शिक्षक - 10,894