सीबीएसई, सीआयएससीईच्या परिक्षा लांबणीवर टाकण्याची महाराष्ट्राची सूचना

सीबीएसई, सीआयएससीईच्या परिक्षा लांबणीवर टाकण्याची महाराष्ट्राची सूचना

मुंबई ः सीबीएसई तसेच सीआयएससीईच्या जुलै महिन्यात होणाऱ्या परिक्षांना महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. या परिक्षा पुढे ढकलण्यात यावा अन्यथा अंतर्गत तपासणीनुसारगुण देण्याची सूचना महाराष्ट्र सरकारने केली आहे.

आयसीएसई (इयत्ता दहावी) तसेच आयसीएस (इयत्ता बारावी) या परिक्षा 1 ते 14 जुलै दरम्यान होतील असे जाहीर करण्यात आले आहे. आयसीएसचे आठ तर आयसीएसईचे सहा पेपर शिल्लक आहेत. सीबीएसईनेही आपल्या परिक्षांसाठी हाच कालावधी ठरवला आहे. सीबीएसईच्या बारावीचे बारा पेपर शिल्लक आहेत, तर सीबीएसईच्या दहावीच्या परिक्षांचे इशान्य भारत तसेच दिल्लीतील परिक्षा शिल्लक आहेत. या परिक्षा जुलैमध्ये नको अशी विनंती अनेक पालक करीत आहेत.

राज्यातील कोरोना महामारीची सध्याची स्थिती तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊनच परिक्षा पुढे ढकलण्याची सूचना केल्याचे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. जुलैत परिक्षा घेतल्यास कोरोनाचा प्रसार विद्यार्थ्यात होण्याचा धोका वाढेल. त्याचबरोबर परिक्षा कर्मचाऱ्यातील कर्मचाऱ्यांनाही लागण होऊ शकेल. त्याचबरोबर त्यावेळी सार्वजनिक वाहतूकीचाही प्रश्न असू शकेल. त्यामुळे त्यांनी अन्य पर्यायांचा विचार करावा अशी सूचना केल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्य सरकारने सीबीएसई तसेच सीआयसीएसई बोर्डास दहावीच्या परिक्षेस सामोरे जाणार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देण्याची सूचना केली आहे. ज्याद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित होऊ शकेल. यासंदर्भात राज्यातील शिक्षण विभागाचे आधिकारी दोन्ही मंडळाच्या आधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. 

सीबीएसई तसेच आयसीएसई मंडळाच्या आधिकाऱ्यांनी सध्या तरी परिक्षांच्या कालावधीत कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले, मात्र त्याचवेळी शनिवारी होणाऱ्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com