Heat Stroke : उष्माघात उपाययोजनांचा अभ्यास करून देशासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करणार; कमल किशोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study heat stroke measures and formulate effective action plan Kamal Kishore mumbai

Heat Stroke : उष्माघात उपाययोजनांचा अभ्यास करून देशासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करणार; कमल किशोर

मुंबई : उष्णतेच्या लाटा बाबत पूर्व नियोजन आणि प्रभावी उपायोजना आणि जीवित हनी टाळणे या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व अभ्यासकांकडून दोन दिवसात झालेल्या विचारमंथनातून एक प्रभावी कृती आराखडा देशासाठी करू असे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई) पवई येथे 'उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023' आयोजित कार्य शाळेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सदस्य सचिव कमल किशोर बोलत होते.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती

व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता,राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यामध्ये देशातील विविध राज्यातील व महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ सहभागी आहेत.

कमल किशोर म्हणाले,गेल्या काही वर्षांपासून जगभरात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांमूळे होणारी हानी टाळण्यासाठी तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन यातून एक चांगले विचारमंथन घडून या आपत्ती मूळे होणारी जीवितहानी टाळता येईल असेही कमल किशोर म्हणाले.

आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना दिलासा मिळणे गरजेचे : प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले की, राज्यात विविध आपत्तीमध्ये वाढणारी मनुष्यहानी टाळण्याकरता राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि त्याचप्रमाणे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. कोणत्याही आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी राज्य शासन ही प्रयत्नशील आहे.

राष्ट्रीय स्तरावरती अजून अभ्यासपूर्ण धोरणे जर आली तर नक्कीच आपत्तीमध्ये लोकांना तात्काळ मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे यासाठी ही कार्यशाळा नक्कीच महत्त्वाची आहे असेहीप्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी,आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी प्रास्ताविक केले.