ACB ची कारवाई; मुंबईचा पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
taking bribe
taking bribe
Updated on
Summary

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबई - मुंबई विभागात लाच घेताना चक्क एका पोलिस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. विकास लोखंडे (वय ३३) असे या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव असून ते अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. संबंधित तक्रारदाराने काल (ता. ८) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

taking bribe
बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार | Bipin Rawat Funeral

दरम्यान घडलेली घटना अशी, नामदेव लोखंडे यांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल असून त्या आरोपीला कोर्टात सादर न करता पोलिस ठाण्यातच जामीन देतो, असे सांगून २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तडजोडीच्या अंती १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने संबधित व्यक्तिने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. यानुसार (ता. ८) सापळा कारवाई करत आरोपी लोखंडे यास १० हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहेत.

taking bribe
'पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता मिळाल्यास बारामतीसारखा विकास करु'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com