पुनावालांना सेनेने धमकावल्याच्या बातमीचा सुभाष देसाईंकडून निषेध

नेमकं काय आहे प्रकरण
Subhash-Desai
Subhash-Desai

मुंबई: सीरम इन्स्टीट्यूटचे आदर पुनावाला यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याबाबत एका वाहिनीने दिलेल्या बातमीचा उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी निषेध केला आहे. हा शिवसेनेची बदनामी करण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीवर आलेल्या बातमीसंदर्भात देसाई यांनी वरीलप्रमाणे भूमिका मांडली आहे. समाजात गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या कारस्थानामध्ये मग्न असलेल्या काही घटकांकडून शिवसेनेची बदनामी करण्याचे डाव खेळले जात आहेत, असेही त्यांनी यासंदर्भात म्हटले आहे. (Subhash desai condemed the news of shivsena activist threaten to Adar poonawal)

Subhash-Desai
म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा

सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची पूर्णपणे खोटी, निराधार आणि शिवसेनेची बदनामी करणारी बातमी काही वाहिन्यांवर काल पसरवली होती. त्याबद्दल शिवसेनेतर्फे कडक शब्दांत निंदा करणारे पत्र त्या वाहिनीच्या प्रमुखांना दिले आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे. त्यांनी हे पत्र समाजमाध्यमांवरही प्रसिद्ध केले आहे. (Subhash desai condemed the news of shivsena activist threaten to Adar poonawal)

Subhash-Desai
'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता

यापूर्वीही तुमच्या वाहिनीच्या एका अँकरने आमच्या एका ज्येष्ठ नेत्याविषयी पूर्वग्रहदूषित विधाने केली होती. त्यामुळे तुमच्या माध्यमसमूहाची राजकीय जाणीव व ज्ञान किती आहे हे आम्हाला माहित नाही. मात्र काल निवडणुक निकालांचा दिवस असल्याने त्या विषयावरची तसेच कोरोनाच्या फैलावासंदर्भातची चर्चा दुसरीकडे वळवण्याचा हेतूही यामागे असू शकतो. या खोट्या बातमीसंदर्भात त्या वाहिनीने कारवाई करावी तसेच क्षमायाचना करावी, असेही पत्रात म्हटले आहे.

कोरोनासारख्या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अतिशय खंबीरपणे सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जात आहे. यापुढेही अशा कारस्थानांना भीक न घालता आमचे समाजकारण आणि जनहिताचे कार्य निर्धारपूर्वक सुरू राहील, असेही देसाई यांनी याबाबत म्हटले आहे.

(संपादन - दीनानाथ परब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com