ठाणे पालिकेसाठी आनंदाची बातमी, 'या' भागात एकाही रुग्णाची नोंद नाही

पूजा विचारे
Monday, 10 August 2020

ठाण्यात कोरोनाची सुरुवात मुंब्रा परिसरातून झाली. त्या झोपडपट्टी भागातून कोरोनाचा धोका आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण आता याच भागातून एक आनंदाची बातमी समोर येतेय. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं असताना मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर येतेय. एकेकाळी मुंबई शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र आता मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. यासोबतच ठाणे शहर, मुंब्रा परिसर, कल्याण पूर्व भाग, उल्हासनगर आणि भिवंडी शहरांमधील रुग्णवाढीच्या प्रमाणात घट होताना दिसतेय. ठाण्यात कोरोनाची सुरुवात मुंब्रा परिसरातून झाली. त्या झोपडपट्टी भागातून कोरोनाचा धोका आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण आता याच भागातून एक आनंदाची बातमी समोर येतेय. 

शुक्रवारी,  झोपडपट्टीचा एक भाग असलेल्या मुंब्रामध्ये एकही नवीन कोविड प्रकरण नोंदविला गेला नाही. १५ जुलैपासून या क्षेत्रात कोरोना व्हायरस प्रकरणाची संख्या १५ च्या खाली असून गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या एकेरी एकल अंकात येतेय. ठाणे पालिका, स्थानिक राजकारणी, पोलिस आणि परिसरातील स्वयंसेवक यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळताना दिसतंय.

हेही वाचाः  कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेकडून तब्बल 'इतके' कोटी खर्च

७ ऑगस्टपर्यंत, सुमारे ८ लाख लोकसंख्या असलेल्या मुंब्रामध्ये १,२५० रुग्णांची नोंद झाली. त्यात  ७८ जणांचा मृत्यू झाला. सध्या या भागात 124 सक्रिय प्रकरणे आहेत. मुंब्र्यामध्ये ४ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला. या भागात असलेली छोटी घरे, अरुंद गल्ली आणि मोठी झोपडपट्टी असल्यानं या भागात सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू करणं हे एक मोठे आव्हान होतं. त्यानंतर पुढील दोन दिवसांत, आणखी प्रकरणे आढळून आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या भागातील ८९ इमारती त्वरित सील केल्या. लोकांना घरी जेवण देण्यात आले. त्यामुळे त्याचा कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत झाली. 

अधिक वाचाः  निसर्गाचं रौद्ररुप! गेल्या दोन महिन्यांत कोसळली तब्बल 'इतकी' हजार झाडं

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जे परिसरातील आमदार आहेत. ते म्हणाले की, मुंब्रा हे एक दाट लोकवस्तीचे क्षेत्र आहे, म्हणून पहिल्या प्रकरणांची माहिती मिळताच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संशयित, सकारात्मक रूग्णांना वेगळे करण्यासाठी त्या भागातील सामान्य चिकित्सक, अधिकारी, स्वयंसेवक आणि पोलिस यांच्याशी समन्वय साधला. आम्ही कोरोनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. ज्यामुळे त्यांची भीती कमी होण्यास मदत झाली. आम्ही संपर्क इतिहासाची चाचणी आणि शोध घेण्यावर भर दिला ज्यामुळे चांगले काम झाले, असंही ते म्हणाले.

suburban Thane district Mumbra slum not record a single new Covid case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suburban Thane district Mumbra slum not record a single new Covid case