उपनगरातील क्षयरोग्यांची फरपट; उपचारासाठी करावी लागतीये तीन रुग्णालयांची वारी

उपनगरातील क्षयरोग्यांची फरपट; उपचारासाठी करावी लागतीये तीन रुग्णालयांची वारी
उपनगरातील क्षयरोग्यांची फरपट; उपचारासाठी करावी लागतीये तीन रुग्णालयांची वारी
Updated on

मुंबई : कोव्हिड रुग्णांची वाताहत कमी होत असतानाच आता क्षयरोगग्रस्त रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागत असल्याचे समोर आले आहे. विक्रोळीतील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना कांजूर मार्गमधील केंद्रात नोंद करावी लागते. तपासणीसाठी घाटकोपरच्या सरोदर रुग्णालयात जावे लागते; इतकेच नाही, तर औषधे घेण्यासाठी पुन्हा महात्मा फुले रुग्णालयात यावे लागत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी फरपट होत आहे. 

विक्रोळीतील अनिल पीटर यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी क्षयरोगाची चाचणी केली. क्षयरोगाचे निदान झाल्याने त्यांना कांजूर मार्ग येथे नोंदणीसाठी पाठविण्यात आले. नोंदणीनंतर ते पुन्हा विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये परतले; मात्र तेथील ओपीडी बंद असल्याने त्यांना तपासणीसाठी घाटकोपरच्या सरोदर रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर औषधे घेण्यासाठी त्यांना पुन्हा महात्मा फुले रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे फारच मनस्ताप सहन करावा लागल्याचे अनिल पीटर सांगतात. ही फरपट एवढ्यावरच थांबली नाही, तर पीटर यांना 15 दिवसांची औषधे दिल्यानंतर पुन्हा कांजूर मार्ग येथे केंद्रात नोंदणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी घाटकोपरच्या सरोदर रुग्णालयात; तर औषधे घेण्यासाठी पुन्हा महात्मा फुले रुग्णालयात जावे लागले. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी फरपट तर होत आहे, शिवाय प्रवासखर्च आणि वेळेचाही अपव्यय होत आहे. सरकार एकीकडे क्षयरोगाविरुद्ध लढा तीव्र करत असताना दुसरीकडे रुग्णाला वणवण भटकावे लागत असल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने ते रुग्णालय बंद करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याच्या अडचणी लक्षात घेत या रुग्णालयाचे काही विभाग हे टागोरनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह येथे हलविण्यात आले आहे; मात्र नागरिकांच्या समस्या काही सुटल्या नाहीत. लोकांच्या सोईसाठी कन्नमवारनगर येथे कंटेनरमध्ये काही ओपीडी सुरू करण्यात आल्या होत्या. डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे त्यादेखील बंद करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने या ओपीडी पुन्हा सुरू कराव्यात. 
- ज्ञानदेव ससाणे, सामाजिक कार्यकर्ते 

------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com