मुंबई विद्यापीठ युवक महोत्सवात शिवळे महाविद्यालयाचे यश 

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

गोवेली महाविद्यालयात गुरुवारी (ता. 23) 51 व्या युवक महोत्सवाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा पार पडली.

मुरबाड (ठाणे) - मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ठाणे ग्रामीण युवक महोत्सवात शिवळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गोवेली महाविद्यालयात गुरुवारी (ता. 23) 51 व्या युवक महोत्सवाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा पार पडली.

यामध्ये शिवळे महाविद्यालयातील महेश तुकाराम घावट - वकृत्व स्पर्धा, शिल्पा मारुती धुमाळ - पेंटिंग, दर्शना जयराम शेलवले - कोलाज या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर मयूर मारुती माळवे याने मिमिक्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महोत्सवात शिवळे महाविद्यालयाची छाप उमटवली. विद्यार्थ्यांना कल्याणचे आमदार नरेंद्र पवार व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ सुनील पाटील यांचे हस्ते परितोषके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार प्राचार्य डॉ. एस एम पाटील यांनी कौतुक केले.

Web Title: The Success of Shivale College in Youth Festival Mumbai University