esakal | कल्पिता पिंपळे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कल्पिता पिंपळे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : फेरीवाल्याच्या चाकूहल्ल्यात हाताची दोन बोटे गमवण्याचा प्रसंग ओढवलेल्या पालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. हातापासून वेगळी झालेली त्यांची बोटे ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुन्हा जोडली आहेत. या बोटांमध्ये पूर्वीप्रमाणे चेतना असेल की नाही हे शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांनी स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. काल रात्री तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया चालली.

फेरीवाल्याने डाव्या हाताची दोन बोटे छाटल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या त्यांच्या बोटांचे तुकडे घेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना वेदांत रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर होताच पहाटे पिंपळे यांच्यावर शस्त्रक्रिया करत त्यांच्या हाताला त्यांची तुटलेली बोटे जोडण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पिंपळे यांची प्रकृतीही ठीक आहे.

फेरीवाला आमचा मार खाईल

ठाणे महापालिकेच्या कासारवडीवली प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांची आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाची बोटं छाटली गेली. या घटनेवर संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी, पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटे छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल.’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

loading image
go to top