esakal | आरोग्य विभागाची झाडाझडती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आरोग्य विभागाची झाडाझडती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : आमदार (MLA) सुनील भुसारा (Sunil Bhusara) यांनी जनता दरबारात नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर मोखाड्यातील कारेगाव (Koregaon) आरोग्य (Health) पथकाला प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी तेथे वैद्यकीय अधिकारी अथवा रुग्णांवर उपचार करणारा एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे आमदार(MLA) भुसारा (Bhusara) यांनी येथील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मोखाड्यातील वाकडपाडा, किनिस्ते, कोचाळे, सायदे परिसरात चिकणगुण्या आणि डेंगीसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. येथील रुग्णांना सरकारी दवाखान्यात योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी आमदार भुसारा यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात केली. तसेच कारेगाव आरोग्य पथकाची दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले. त्याची तातडीने दखल घेत आमदार सुनील भुसारांनी कारेगाव आरोग्य पथकाला अचानक भेट दिली. या वेळी येथे वैद्यकीय अधिकारी अथवा रुग्णांवर उपचार करणारा एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. केवळ एक शिपाई तेथे उपस्थित होता.

कारेगाव आरोग्य पथकांतर्गत अतिदुर्गम करोळ-पाचावर, कडुचीवाडी, कोचाळे आणि कारेगाव आदी गावांचा आणि पाड्यांचा समावेश आहे. येथील रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. हे आरोग्य पथक खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत आहे. या आरोग्य पथकाच्या इमारतीचीदेखील दुरवस्था झाली आहे.

हेही वाचा: अधिकाऱ्यांकडूनच आरोग्य विभागाचे 'ऑपरेशन'; कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

आदिवासी ग्रामस्थांना सरकारी दवाखान्यात केवळ पाच रुपयांत उपचार मिळतात; मात्र कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आदिवासींना पदरमोड करून खासगी दवाखान्यांत उपचारांसाठी जावे लागते आहे. ही बाब गंभीर असून संबंधित कामचुकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- सुनील भुसारा, आमदार

या आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित गोखले यांना साथ रोग काळात मुख्यालयात राहण्याबाबत आणि कार्यक्षेत्रातील गाव, पाड्यातील नागरिकांच्या आजारांवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना दोन वेळेस नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

- डॉ. पुष्पा मथुरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा.

loading image
go to top