गतीमंद बालसुधारगृहात अचानक कोरोनाचा फैलाव! तब्बल इतक्या जणांना झाली बाधा

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील 29 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहेत.

मुंबई : मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील 29 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहेत. या शेल्टर होममधील 60 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे.

डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केलेल्या हॉटेल्सचे बिल भरायचे कोणी? वाचा सविस्तर...

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठीही शेल्टर होम आहे. त्यात लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात येते. या सुधारगृहात सध्या 268 व्यक्ती आहेत. त्यातील काहींना लक्षण आढळल्यामुळे 60 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील 29 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे. बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षण नाहीत. पण काही व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब सारखे आजार आहेत. एकाला क्षयरोगाचाही आजार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे. तसेच कोरानासह इतर आजार असलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावात सुरू होता धक्कादायक प्रकार; टेम्पो पकडल्याने झाला उलगडा..

या सर्वांना नेमका कोणामुळे कोरोना झाला, हे स्पष्ट झाले नसले, तरी या शेल्टर होममध्ये काम करणारे कर्मचारी व मानखुर्द बालसुधारगृहातील कर्मचारी एकाच कर्मचारी वसाहतीत राहतात. मानखुर्दच्या बालगृहामध्ये रक्षक पदावर कार्यरत असलेल्या जितेंद्र सोळंकी या कर्मचारयाचा नुकताच  (ता.16) कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच त्यावेळी दोन कर्मचारयांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत सुधारगृहाचे प्रभारी डॉ. जयेश वसूले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 29 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suddenly spread corona! So many people were affected IN MANKHURD